शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील जि.प. शाळांचे ३० विद्यार्थी इस्रो दौऱ्यासाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:12 IST

२९ एप्रिलपर्यंत शैक्षणिक दौरा : शैक्षणिक व पर्यटनस्थळांना देणार भेटी

चंद्रपूर : नवरत्न स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनात चमकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील ३० विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून इस्रो दौऱ्यासाठी रवाना केले. २९ एप्रिलपर्यंत त्यांचा हा शैक्षणिक दौरा चालणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये अंतराळविषयक ज्ञानात भर पडावी, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या पुढाकाराने नवरत्न स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले योग्य ध्येय ठरवावे, संशोधक व चिकित्सक व्हावे, परीक्षेत केवळ गुण मिळाले पाहिजे, असा अट्टहास न करता एक चांगला माणूस म्हणून आपले जीवन कसे जगता येईल, यादृष्टीने प्रयत्नशील असावे, असा सल्ला इस्रो दौऱ्याला जाण्यापूर्वी सीईओ जॉन्सन यांनी दिला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूळकर उपस्थित होते. दौऱ्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विशाल देशमुख यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे व निकिता ठाकरे, गटशिक्षणाधिकारी व शिक्षक आदी उपस्थित होते.

अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात भर पडेल. त्याचप्रमाणे परिसरातील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती संग्रहित करता येईल. पर्यावरण व इतर भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होईल, असे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.

असे आहे अभ्यास दौऱ्याचे स्वरूप...

इस्रो (बंगळुरू) दौऱ्यादरम्यान शैक्षणिक व पर्यटनस्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात बंगलोर पॅलेस, लालबाग बॉटनिकल गार्डन, टिपू सुलतान समर पॅलेस व गव्हर्नमेंट म्युझियम, इस्रो, बंगलोर फिल्म सिटी, जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम व बंगलोर एक्वेरियम, एचएएल एरोस्पेस म्युझियम, बनरघट्टा नॅशनल पार्क, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, बंगलोर सायन्स म्युझियम, मैसूर फॅन्टॅसी पार्क, मैसूर स्नो सिटी व मैसूर पॅलेस असे दौऱ्याचे स्वरूप राहणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाchandrapur-acचंद्रपूर