शेतकऱ्याकडून शाळेसाठी ३० हजारांची मदत

By Admin | Updated: October 19, 2015 01:31 IST2015-10-19T01:31:47+5:302015-10-19T01:31:47+5:30

येथून जवळच असलेल्या चालबर्डी (रै.) येथील सुमित्रा जोगी व गोसाई जोगी या वृध्द शेतकरी दाम्पत्याने शाळेसाठी ३० हजार रूपयांची रक्कम

30 thousand help from the farmer to the school | शेतकऱ्याकडून शाळेसाठी ३० हजारांची मदत

शेतकऱ्याकडून शाळेसाठी ३० हजारांची मदत

जोगी दाम्पत्याचे दातृत्व : विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था होणार
घोडपेठ : येथून जवळच असलेल्या चालबर्डी (रै.) येथील सुमित्रा जोगी व गोसाई जोगी या वृध्द शेतकरी दाम्पत्याने शाळेसाठी ३० हजार रूपयांची रक्कम देणगीच्या स्वरूपात दिल्याने शाळा व्यवस्थापनाकडून गुरूवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.
चालबर्डी (रै.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला आदर्श व अद्ययावत करण्याचा संकल्प गांधीजयंती निमीत्त आयोजित बालक-पालक मेळाव्याप्रसंगी करण्यात आला होता. त्याद्वारे शाळेमध्ये ई-लर्निंग शिक्षणप्रणाली व विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून जलशुद्धीकरण यंत्र लावण्याची कल्पना सुचविण्यात आली. यासाठी भक्कम निधीची आवश्यकता होती. त्यानुसार भद्रावती येथील रोटरी क्लब तसेच लोकसहभागातून निधी उभारण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान, गावातील गोसाई जनार्धन जोगी व सुमित्रा जोगी या वृद्ध शेतकरी दाम्पत्याने या समाजकायार्साठी तीस हजार रूपयांची रोख रक्कम देणगी म्हणून शाळेतील व्यवस्थापनाच्या सुपुर्द केली. याप्रसंगी शाळेतर्फे जोगी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. गोसाई जोगी यांना सुमित्रा जोगी यांच्या रूपाने गृहदक्ष पत्नी लाभल्या. त्यांनी आपल्या सर्व मुलांना संस्काराचे धडे देवून उच्चशिक्षण दिले. आज त्यांची मुले सरकारी नोकरीवर आहेत. सोबतच आपल्या मातापित्यांचा व्यवस्थित सांभाळही करीत आहेत. सुमित्रा जोगी यांच्या पुढाकाराने शाळेला देणगी देण्याचा निर्णय घेतल्याचे जोगी कुटूंबियांनी सांगितले.
येत्या काही महिन्यांत शाळेच्या नावाने एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट करून त्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशांवर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला उपयोगी पडतील, अशा वस्तू भेट स्वरूपात देण्याचा मानस गोसाई जोगी यांचे पुत्र कोमेश्वर जोगी यांनी सत्कारप्रसंगी बोलून दाखविला. (वार्ताहर)

Web Title: 30 thousand help from the farmer to the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.