शटरचे कुलूप फोडून ३ लाख ८२ हजार पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST2021-04-08T04:28:54+5:302021-04-08T04:28:54+5:30
ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी येथील संत तुकोबावाडीमधील श्री हाईट्स अपार्टमेंटमध्ये दिल्ली व्हेरी कुरिअर प्रायव्हेट लिमिटेड व ॲमेझाॅन हे कार्यालय ...

शटरचे कुलूप फोडून ३ लाख ८२ हजार पळविले
ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी येथील संत तुकोबावाडीमधील श्री हाईट्स अपार्टमेंटमध्ये दिल्ली व्हेरी कुरिअर प्रायव्हेट लिमिटेड व ॲमेझाॅन हे कार्यालय आहेत. येथील व्यवस्थापक तुषार राऊत रविवारी सायंकाळी कार्यालय बंद करताना आपल्या दिल्ली व्हेरी कुरिअर प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयात एक लाख ८९ हजार ९०८ रुपयांची रक्कम लाॅकरमध्ये ठेवून घरी गेले. तर बाजूच्या ॲमेझाॅन कार्यालयात एक लाख ९२ हजार ५५८ रु. ठेवले होते. त्यानंतर त्याच रात्री अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील रक्कम लंपास केली. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता ही बाब उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सदर घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे करीत आहेत.