जिल्ह्यात ३ कोरोनामुक्त, ६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST2021-09-27T04:30:20+5:302021-09-27T04:30:20+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात ३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तसेच ६ जण नव्याने पॉझिटिव्ह ...

3 corona free, 6 positive in the district | जिल्ह्यात ३ कोरोनामुक्त, ६ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ३ कोरोनामुक्त, ६ पॉझिटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात ३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तसेच ६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या ६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ४, बल्लारपूर २, भद्रावती, चंद्रपूर तालुका, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ७२२ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १५३ झाली आहे. सध्या २८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ९७ हजार ८९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाख ७ हजार ७७२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 3 corona free, 6 positive in the district