२९ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:07 IST2019-01-12T22:07:40+5:302019-01-12T22:07:54+5:30
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील २९ हजार ४४७ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केली आहे.

२९ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील २९ हजार ४४७ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील ३९५ सहकारी संस्थेच्या एकूण कर्जदार संख्या ६६ हजार १२२, प्रोत्साहन सभासद संख्या ४१ हजार १८०, एकरकमी परतफेड सभासद संख्या पाच हजार ९२७, एकूण सभासद संख्या एक लाख १३, हजार २२९ इतके सभासद कर्जमाफीस पात्र होते. पैकी उर्वरीत सभासद संख्या १८ हजार एक, प्रोत्साहन सभासद संख्या आठ हजार ५३७ व एकरकमी परतफेड सभासद संख्या दोन हजार ९५९ एकूण सभासद संख्या २९ हजार ४९७ सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अजुनपर्यंत लाभ मिळाला नाही. तरी या सर्व पात्र सभासदांना त्वरित या योजनेचा लाभ मिळावा, व कर्जमाफीची रक्कम प्राप्त करून द्यावी, अशी मागणी गजानन पाथोडे यांनी केली आहे.
यासह २०१८- १९ मध्ये सहकारी संस्थाद्वारा वाटप करण्यात आलेल्या सभासदांना कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याचा वसुली भरण्याच्या पत्राच्या संदर्भांनुसार २०१८- १९ मध्ये वाटप करण्यात आलेल्या कर्जाची व्याजासाहित वसुली न करता जुन्याच पध्दतीप्रमाणे फक्त मुद्दल रक्कम वसूल करून व्याजाची रक्कम शासनाकडून आल्यानंतर कर्ज खात्यात वर्ग करावी अशी मागणीही पाथोडे यांनी केली. याबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.