२४ तासात २८५ जण कोरोनातून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:26+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. एक हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १९ हजार ४८६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

285 released from Corona in 24 hours | २४ तासात २८५ जण कोरोनातून मुक्त

२४ तासात २८५ जण कोरोनातून मुक्त

Next
ठळक मुद्दे१९९ नव्याने बाधित : दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  मागील २४ तासात २८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १९९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दरम्यान,  दोघांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. एक हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १९ हजार ४८६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. 
मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी येथील २९ वर्षीय पुरूष व माता मंदिर वार्ड वरोरा येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६७, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ ५, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 285 released from Corona in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.