घुग्घुसमधील राजीव रतन रुग्णालयात २८ ऑक्सिजन बेडची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:51+5:302021-04-25T04:27:51+5:30
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात वेकोलीच्या वतीने २८ आक्सिजन बेड उपलब्ध करून दिले ...

घुग्घुसमधील राजीव रतन रुग्णालयात २८ ऑक्सिजन बेडची सोय
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात वेकोलीच्या वतीने २८ आक्सिजन बेड उपलब्ध करून दिले असून येत्या आठवड्याभरात टेम्पो क्लबमध्ये आणखी २८ ऑक्सिजनयुक्त बेडची सोय उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या कोविड केंद्रामुळे बऱ्याच प्रमाणात रुग्णाला दिलासा मिळणार आहे.
घुग्घुस, नकोडा, उसगाव परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाला कोरोना केंद्रावर ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटर बेड वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विविध राजकीय व सामाजिक स्तरावरून राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. त्याची वेकोली क्षेत्राच्या मुख्य महाव्यवस्थापक उदय कावळे यांनी दखल घेत तत्काळ २८ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले असून येत्या आठ दिवसात परत टेम्पो क्लबमध्ये २८ ऑक्सिजन बेड हे उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आहे. त्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
याबरोबरच घुग्घुसची कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणासाठी सध्या उपयोगात नसलेल्या इमारती ताब्यात घेऊन
संस्थात्मक विलगीकरणाची सोय उपलब्ध करावी, यासाठी नगर परिषदने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.