शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

२७४ जणांना सापाचा डंख; २७० जणांचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : साप हा शेतकऱ्याचा मित्र असला तरी गत तीन वर्षांपासून सर्पदंशाच्या घटना वाढू लागल्या. यंदा जानेवारी ते जून २०२१ पर्यंत सर्पदंशाच्या २७४ घटनांची नोंद झाली. वेळीच उपचार झाल्याने २७० जणांचा जीव वाचला, तर चौघांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश प्रतिबंधक लस (स्नेक अँटिव्हेनिन) रुग्णांना मोफत दिले जाते. मात्र, मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा व नागरिकांतील गैरसमज आदी कारणांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला गमावण्याच्या घटना चिंतेत भर घालणाऱ्या आहेत.सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात. आरोग्य प्रशासनाच्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यात विषारी सर्पदंशाच्या २७४ घटना घडल्या, तर उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाल्याने १०५ रुग्णांचा जीव वाचला. त्यासाठी सर्पदंशाची घटना घडल्यानंतर गावठी उपचार किंवा मांत्रिकावर विश्वास न ठेवता रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

जूनमध्ये १०६ जणांना सर्पदंशजून २०२१ मध्ये सर्पदंशाच्या १०६ घटना घडल्या. आठ जणांवर ओपीडी, तर ९७ रुग्णांवर आयपीडीमध्ये उपचार करण्यात आले. यातील सिंदेवाही व गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत दोघांचा मृत्यू झाला. बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, कोरपना, मूल, राजुरा, सावली, वरोरा व गडचांदूर रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना हमखास घडतात.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात भरती केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. सध्या तरी रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधी उपलब्ध आहे. सर्पदंशाच्या रुग्णांच्या उपचाराला कदापि विलंब होऊ देऊ नका, अशा सूचना डॉक्टरर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. सर्पदंश, श्वानदंश व विंचू दंशाच्या घटना व परिणामकारक उपचाराबाबत सातत्याने आढावा घेणे सुरू आहे.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

मागणीनुसार अल्प औषधी पुरवठाराज्यात सर्पदंशावरील औषधी सद्य:स्थितीत फक्त हाफकीन या एकमेव संस्थेत बनविले जाते. मागणीच्या तुलनेत औषधीचा कमी पुरवठा होतो. एकूण मागणीच्या तुलनेत १० ते १५ टक्के औषधी उपलब्ध होत असल्याने अडचणी वाढतात. 

गैरसमज व अंधश्रद्धा धोकादायकच सापाचे विष मंत्राने उतरते. कडुलिंबाचा पाला व मिरची खाल्ल्यास प्रकृती सुधारते, सर्पदंश झालेल्या जागेवर औषधी वनस्पती उगाळणे किंवा बिया वगैरे खायला देणे, सर्पदंशाच्या ठिकाणी गरम केलेल्या लोखंडाने डागण्या देणे, यासारखे अनेक गैरसमज-अंधश्रद्धा शहरी व ग्रामीण भागात आजही आहेत. हे सर्व उपाय निरर्थक व वेळ वाया घालविणारे आहेत. असे केल्यास व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होतो. 

 

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी