२५१ नवे रूग्ण, सहा कोरोना बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:25+5:30

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्र्रपूर येथील ८२ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला १० सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने मंगळवारी मृत्यू झाला. दुसरा मृत्यू आरटीओ ऑफिस परिसर, चंद्रपूर येथील ५२ वर्षीय पुरूषाचा झाला आहे.

251 new patients, six corona sufferers die | २५१ नवे रूग्ण, सहा कोरोना बाधितांचा मृत्यू

२५१ नवे रूग्ण, सहा कोरोना बाधितांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ६,३०९ पॉझिटिव्ह : उपचारानंतर ३,५३८ निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात २५१ नवीन बाधित आढळल्याने कोरोना पॉझिटिव्हची संख्या ६ हजार ३०९ झाली तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ हजार ५३८ बाधित बरे झाले. २ हजार ६८७ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ बाधितांचा मृत्यू झाला. यापैकी जिल्ह्यातील ७७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन, यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्र्रपूर येथील ८२ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला १० सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने मंगळवारी मृत्यू झाला. दुसरा मृत्यू आरटीओ ऑफिस परिसर, चंद्रपूर येथील ५२ वर्षीय पुरूषाचा झाला आहे. तिसरा मृत्यू कन्हाळगाव ब्रह्मपुरी येथील पुरूष, चौथा मृत्यू घुटकाळा वार्ड चंद्रपूर येथील ५० वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. चंद्रपूर शहरातील भानापेठ येथील ६९ वर्षीय पुरुष बाधिताचाही मृत्यू झाला. बाधिताला कोरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होता.
सहावा मृत्यू गांधी वार्ड, ब्रह्मपुरी येथील ५२ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. बाधिताला १२ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती केले होते. या बाधितालाही न्युमोनियाचा आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

तालुकानिहाय रूग्ण
चंद्रपूर शहर व परिसरातील १०१, कोरपना तालुका १, गोंडपिपरी ७, चिमूर ८, नागभीड ४, पोंभुर्णा ९, बल्लारपूर १८, ब्रह्मपुरी २८, भद्रावती ६, मूल तालुका ७, राजुरा ९, वरोरा तालुका १५, सावली २०, सिंदेवाही तालुका १४, वणी-यवतमाळ २, लाखांदूर-भंडारा व वडसा-गडचिरोली येथील प्रत्येकी एक असे एकूण २५१ कोरोना बाधित पुढे आले आहे.

माजी आमदार व नगराध्यक्ष बाधित
राजुरा : राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर व नगराध्यक्ष अरूण धोटे हे कोरोना बाधित झाले. शहरात कोरोनाने शिरकाव केल्याने १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. या कालावधित रूग्णालये, अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये, असे आवाहन तहसीलदार डॉ. होळी यांनी केले.

Web Title: 251 new patients, six corona sufferers die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.