२५ पाणीपुरवठा योजनांना अॅटोमॅटिक पंप स्टार्टर
By Admin | Updated: December 28, 2016 01:43 IST2016-12-28T01:43:58+5:302016-12-28T01:43:58+5:30
लांब अंतरावर असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अनेकदा अडचणी येत होत्या. ही अडचण दूर

२५ पाणीपुरवठा योजनांना अॅटोमॅटिक पंप स्टार्टर
जिल्हा परिषदेचा उपक्रम : ५० लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता
चंद्रपूर : लांब अंतरावर असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अनेकदा अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या पाणी पुरवठा योजनांना सौर ऊर्जेवर आधारित अॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील २५ पाणी पुरवठा योजनांची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी ५० लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक नळ योजना नदी व नाल्यावर आहेत. तिरावर नळ योजनेची टाकी असताना पंप टाकीपासून लांब अंतरावर असते. पावसाळ्याच्या दिवसांत तसेच इतरही वेळेस पंप सुरू करताना अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा पाणी पुरवठा प्रभावित होत असते. पंपमध्ये बिघाड आल्यास योजनाच बंद पडून गावाचा पाणी पुरवठा बंद असते. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित अॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणार आहे. यामुळे घरबसल्या योजना बंद किंवा चालू करता येणार आहे.
२०१६-१७ या वित्तीय वर्षात जिल्हा देखभाल निधी ५० लाख रूपये प्रस्तावित करण्यात आली. ५ आॅक्टोंबर २०१६ च्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. यासाठी २५ गावांची निवड करण्यात आली असून स्थायी समितीने ५० लाख रूपयाच्या कामास सौर ऊर्जेवर आधारित अॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
या गावातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश
४सौर ऊर्जेवर आधारित अॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी पाणी पुरवठा योजना, चंद्रपूर तालुक्यातील चेंकनिंबाळा, म्हातारदेवी, घुग्घुस, दुर्गापूर, सिन्हाळा, चांदासुर्ला, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नं. २, बोर्डा बोरकर, सातारा तुकूम, नवेगाव मोरे, डोंगरहळदी, पिपरी देशपांडे, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, मानोरा, कोठारी, सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, मूल तालुक्यातील राजोली, खालवसपेठ, चिखली, नागभीड तालुक्यातील सावरगाव, जिवती तालुक्यातील आंबेझरी, चिमूर तालुक्यातील खुटाळा व वरोरा तालुक्यातील येवती या पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.