२५ पालकांना मिळणार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:46+5:302021-04-12T04:25:46+5:30
चंद्रपूर : विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास पालकांना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. ...

२५ पालकांना मिळणार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह अनुदान
चंद्रपूर : विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास पालकांना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून जिल्ह्यातील २५ पालकांना लवकरच शाळांमार्फत धनादेश वितरीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांमध्ये १३५ विद्यार्थ्यांचा अपघात मृत्यू झाला.
विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास पालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेनुसार एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची तर कायम अपंगत्व आल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. मागील पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात १३७ प्रकरणापैकी ११० विद्यर्थ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला तर मागील दोन वर्षात २७ प्रकरणाचे अनुदान प्रलंबित होते. यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यान, यातील २५ प्रकरणाचे अनुदान प्राप्त झाले असून शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची रक्कम वर्ग केली आहे. लकरच पालकांना ७५ हजार रुपयाचे धनादेश वितरीत केले जाणार आहे.
बाॅक्स
मागील पाच वर्षातील मृत्यूचे कारण
पाण्यात बुडून ५२
सर्प दंश १२
वाहन अपघात ५०
वाघ हल्ला ०४
अन्य कारण १६
बाॅक्स
तालुकानिहाय सानुग्रहचंद्रपूर १
भद्रावती २
सावली ५
ब्रह्मपुरी २
कोरपना १
चिमूर ४
नागभीड २
मूल १
सिंदेवाही १
राजुरा २
बल्लारपूर २
गोंडपिपरी २