शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

२३५ जणांचे नामांकन अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप  केले जाणार आहे. यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी चंद्रपूर, मूल तालुक्यात प्रत्येकी १, चिमूर ४ आणि वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी २२ नामांकन अर्ज दाखल झाले होते.

ठळक मुद्देग्रा. पं. निवडणूक : अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी २०२१ रोजी  होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत २३५ जणांनी  ऑपलाईन उमेदवारी अर्ज दाखल कले. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने यंत्रणा सज्ज केली आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप  केले जाणार आहे. यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी चंद्रपूर, मूल तालुक्यात प्रत्येकी १, चिमूर ४ आणि वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी २२ नामांकन अर्ज दाखल झाले होते. सोमवारी चिमूर तालुक्यात ३५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची आपले सेवा केंद्रावर संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम  २३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात  येणार आहे. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिली.  

तालुकानिहाय दाखल झालेले ऑफलाईन उमेदवारी अर्ज राजुरा ३६, कोरपना ८, गोंडपिपरी २६, चंद्रपूर २८, मूल २६, पोंभुणार् २, बल्लारपूर ३१, ब्रह्पुरी ४१, सिंदेवाही ५, सावली १३, चिमूर ३९, नागभीड ३०, वरोरा ७२ व भद्रावती तालुक्यात ऑफलाईन २, असे एकूण २३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारपर्यंत दाखल केलेल्या ऑनलाईन अर्जांची माहिती संकलित करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक प्रशासनाकडून सुरू होते.

माजरीत लिंक फेलमुळे तारांबळमाजरी : ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ऑनलाईन नामांकन अर्ज भरताना मंगळवारी दुपारपासून सर्व ऑनलाईन अर्ज भरताना ठिकाणी लिंक फेल झाले. त्यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ऑफलाईन नामांकन घेण्याबाबत जिल्हाधिका-यांकडून आदेश नाही, अशी माहिती तहसीलदार महेश शिंतोडे यांनी  दुपारी दिली. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी विविध ठिकाणी महासेतु व इतर ठिकाणावरून अर्ज भरून क्षेत्राच्या अधिकारीनुसार अर्ज जमा करायचा आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक