गत २४ तासात २३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST2021-01-25T04:29:21+5:302021-01-25T04:29:21+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर २३ ...

23 positive in last 24 hours | गत २४ तासात २३ पॉझिटिव्ह

गत २४ तासात २३ पॉझिटिव्ह

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर २३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ९५९ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ४१० झाली आहे. सध्या १६४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९५ हजार ५३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ६८ हजार ९६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३८५ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १३, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या २३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील आठ, चंद्रपूर तालुका चार, बल्लारपुर एक, भद्रावती तीन, ब्रह्मपुरी एक, मूल एक, राजुरा एक, चिमूर तीन, कोरपना येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

Web Title: 23 positive in last 24 hours