२३ कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:29+5:302021-02-20T05:24:29+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ३१७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८०३ ...

23 Corona victims, one killed | २३ कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यू

२३ कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ३१७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८०३ झाली आहे. सध्या ११८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख ८ हजार ७८५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८३ हजार ६४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या वडगाव पोलीस चौकी हद्दीतील २७ वर्षीय युवकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९६ बाधितांचा मृत्यू झाला. यापैकी जिल्ह्यातील ३५८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या २३ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १०, चंद्रपूर तालुक्यात तीन, बल्लारपूर दोन, सिंदेवाही दोन, मूल एक, वरोरा चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 23 Corona victims, one killed