२२३ कर्मचारी ठरले अज्ञानी
By Admin | Updated: October 19, 2014 23:51 IST2014-10-19T23:51:37+5:302014-10-19T23:51:37+5:30
प्रशासनामध्ये अनेक कामे करून फाईल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आपले अज्ञात स्पष्ट केले आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील १ हजार ५१४ मतदार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल

२२३ कर्मचारी ठरले अज्ञानी
चंद्र्रपूर : प्रशासनामध्ये अनेक कामे करून फाईल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आपले अज्ञात स्पष्ट केले आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील १ हजार ५१४ मतदार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २२३ कर्मचाऱ्यांनी अवैध मतदान केले आहे. यामुळे शिक्षीत असून आपला अज्ञानीपणा पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी दाखवून दिला आहे.
१५ आॅक्टोबरला विधानसभेसाठी मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आपला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागाने कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची सोय करून दिली. यासाठी त्यांना बॅलेट कुपनही देण्यात आले. १ हजार ५१४ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील २६ कर्मचाऱ्यांच्या पसंतीत एकही उमेदवार नसल्याने त्यांनी नोटाचा वापर केला. तर १ हजार २९१ मतदारांनी विविध पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना मतदान केले. २२३ कर्मचाऱ्यांनी मतदान करूनही चुकविल्याने त्याचे मतदान बाद झाले आहे.
शासकीय कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या कर्मचाची शिक्षित आणि हुशार असतो. शासन त्यांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारे करतात. मात्र एखाद्या अशिक्षित उमेदवारालाही लाजवेल अशी कामगीरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील २२३ कर्मचारी मतदारांनी केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क सायकल रॅली काढून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना विनंती केली. कर्मचाऱ्यांचे यासाठी अनेकवेळा प्र्रशिक्षणही झाले. तरीही तब्बल २२३ कर्मचाऱ्यांनी आपले अज्ञात दाखवून देत मतदानातून आपले मत बाद केले आहे.(नगर प्रतिनिधी)