२२ ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:27+5:302021-03-09T04:31:27+5:30
मागील काही दिवसांपासून शहरात गर्द व ब्राऊन शुगर येत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. ...

२२ ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त
मागील काही दिवसांपासून शहरात गर्द व ब्राऊन शुगर येत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एनडीपीएस पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले. या पथकाला लालपेठ कॉलरी येथील युवक ब्राऊन शुगरची विक्री करण्याकरिता चंद्रपूर-नागपूर रोडवरील उड्डाणपुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून त्याची अंगझडती घेतली. यावेळी कॉलेज बॅगमध्ये २२ ग्रॉम ४१० मिली ग्रॉम ब्राऊन शुगर आढळून आला. पोलिसांनी १ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अजय धुनीरवीदासला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, राजेंद्र खनके, नितीन जाधव, महेंद्र भुजाडे, जमिर पठाण, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, अमोल धंदरे, संदीप मुळे, जावेद सिद्दीक्की, दिनेश अराडे आदींनी केली.