महिला मेळाव्यात २२ व्यक्तींचा सत्कार
By Admin | Updated: August 22, 2016 01:59 IST2016-08-22T01:59:09+5:302016-08-22T01:59:09+5:30
नगर पंचायत कोरपना यांच्यातर्फे नगरपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी महिला मेळावा घेण्यात आला.

महिला मेळाव्यात २२ व्यक्तींचा सत्कार
कोरपना: नगर पंचायत कोरपना यांच्यातर्फे नगरपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी महिला मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात गावातील सामाजिक कार्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या २२ व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कोरपना गावातील नागरिकांनी सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजातील सेवा करण्याचे धाडस केले आहे. कोरपना येथे डॉक्टर या पदावरुन जनतेची सेवा करणारे डॉ. भास्कराव मुसळे, गोरगरीब जनतेला आधार देणारे भारत चन्ने, प्रभाकर गेडाम, कोरपनाचे पत्रकार मनोज गोरे, भाऊराव पाटील, कोंडुजी कुमरे, शामराव मुक्के, जमुभाई इस्माईलभाई, मालेकर, सुभाष चामाटे, रशिद भाई, प्रफुल बुटले, स्वप्नील भलमे, केतन धारणकर, गंगाधर गिरटकर, शुद्रधन भगत, विजय बोरडे अशा २२ व्यक्तींचा सत्कार कोरपना नगरपंचायतीकडून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, कार्यक्रमाचे उद्घाटन कोरपनाच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती श्रीधरराव गोंडे, जि.प. सदस्य उत्तमराव पेचे, कोरपना नगर अध्यक्षा नंदा बावणे, कोरपना नगरपंचायत उपाध्यक्ष मुदूस अली ताहेर अली, नगर पंचायत मुख्याधिकारी आर. एन. भेलावे, बांधकाम सभापती मनोहर चन्ने, आरोग्य सभापती न.प. विजय तेलंग, बालकल्याण सभापती रेखा चन्ने, संचालक जोस्ना वैरागडे, सभापती पतसंस्था कोरपना भारत चन्ने, नगरसेवक दिवाकर बोरडे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा मोहीतकर, वहाबभाई, डॉ. मुसळे व सर्व संचालक उपस्थित होते. महिला मेळाव्यात कोरपना येथील हॉटेल चालवून उदरनिर्वाह करणारा युवक इसमाईल शेख यान ेमागील उन्हाळ्यात कोरपनावासीयांना टँकरने पाणी वाटपाचे काम केले. त्यांचा नगर पंचायतकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक विजय बावने यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)