विवाहबंधनात अडकले २२ अंध-अपंग युगूल
By Admin | Updated: February 16, 2015 01:09 IST2015-02-16T01:09:11+5:302015-02-16T01:09:11+5:30
अवतार मेहरबाबा बहुउद्देशिय संस्थेद्वारा संचालित स्व.गौरवबाबू पुगलिया उपवर-वधू सूचक केंद्र तथा श्री वर्धमान सोशल अॅन्ड एज्यूकेशन अकॅडमीद्वारा संचालित ...

विवाहबंधनात अडकले २२ अंध-अपंग युगूल
चंद्रपूर : अवतार मेहरबाबा बहुउद्देशिय संस्थेद्वारा संचालित स्व.गौरवबाबू पुगलिया उपवर-वधू सूचक केंद्र तथा श्री वर्धमान सोशल अॅन्ड एज्यूकेशन अकॅडमीद्वारा संचालित श्री महावीर मानवसेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने २२ अंध-अपंग युगुलांचा सामूहिक विवाह लावून देण्यात आला. या सोहळ्यात सहभागी युगुलांच्या चेहऱ्यावर जीवनसाथी मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
हिंदू विवाह पद्धतीनुसार २२ जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. सोहळ्याच्या एक दिवसांपूर्वी नववधु-वरांना पारंपारिक हळद तथा वधुंच्या हातांवर मेंहदी काढून देण्यात आली. यावेळी वर-वधुंचे कुटुंबीय तथा मित्रमंडळी उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यातील सर्व उपवर मुली महाराष्ट्रातील आहे. तर उपवर मुलांमध्ये १८ जण महाराष्ट्रातील, ३ मध्यप्रदेश, १ दिल्लीतील आहे. कन्यादान श्यामबाबू पुगलिया यांनी केले. यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला. विवाह सोहळ्याला शहरातील नागरिक, महिला तथा वधु-वरांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)