तस्कराकडून जप्त केलेले २१ कासव राजुरा वन अधिवासात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:53+5:302021-01-08T05:35:53+5:30
ठाणे व मुंबई वनक्षेत्रात काही दिवसांपूर्वी चांदणी कासवाची (स्टार टॉरटाॅईज) तस्करी सुरू होती. कारवाईदरम्यान आरोपीकडून २१ कासवे जप्त करण्यात ...

तस्कराकडून जप्त केलेले २१ कासव राजुरा वन अधिवासात सोडले
ठाणे व मुंबई वनक्षेत्रात काही दिवसांपूर्वी चांदणी कासवाची (स्टार टॉरटाॅईज) तस्करी सुरू होती. कारवाईदरम्यान आरोपीकडून २१ कासवे जप्त करण्यात आली होते; परंतु जप्त करण्यात आलेल्या कासवांना आवश्यक असलेले नैसर्गिक वातावरण, अधिवास, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील काही वनक्षेत्रांत असल्याने त्यांना या क्षेत्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विशेष बंदोबस्तात या २१ कासवांना राजुरा वनपरिक्षेत्रात आणण्यात आले आणि या वन परिक्षेत्रातील खांबाला, राजुरा, सिरसी या नियत क्षेत्रात सोडण्यात आले.
मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण, ताडोबा क्षेत्र संचालक रामगावगावकर, मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वात ही कासवे सोडण्यात आली. यावेळी ठाणे परिक्षेत्राचे वन्यजीव वनपाल मनोज परदेशी, रेस्क्यू पथकाचे संतोष भगणे, नैमीन सौदिया, वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा, टेंभूरवाहीचे क्षेत्र साहाय्यक श्रीनिवास कटकू, तथा राजुरा वनक्षेत्रातील काही वनकर्मचारी उपस्थित होते.