२१ मराठी शाळा होणार डिजिटल

By Admin | Updated: February 21, 2017 00:29 IST2017-02-21T00:29:38+5:302017-02-21T00:29:38+5:30

स्पर्धेत टिकून राहायच असेल तर आधुनिक युगात डिजिटल शाळेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

21 Marathi schools will be digital | २१ मराठी शाळा होणार डिजिटल

२१ मराठी शाळा होणार डिजिटल

लोकसहभागाच्या प्रथम शाळेला भेट : विहीरगाव जि.प. माध्यमिक शाळा
सास्ती : स्पर्धेत टिकून राहायच असेल तर आधुनिक युगात डिजिटल शाळेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मराठी शाळासुद्धा विद्यार्थ्यांना आधुनिक उपकरणाच्या वापर करण्यात मागे नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात लोकसहभागातून २१ मराठी माध्यमिक शाळा डिजिटल होत आहेत. त्यातील प्रथम डिजिटल शाळा होण्याचा गौरव राजुरा तालुक्यातील विहीरगावातील मराठी माध्यमिक या शाळेला मिळाला आहे.
राजुरा शहरापासून अवघ्या १२ किलोमिटर अंतरावर दुर्गम भागात १९७४मध्ये विहीरगाव मराठी माध्यमिक शाळा स्थापन झाली. तेव्हापासून ही शाळा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. या शाळेत विहीरगाव, कोहपरा, पंचाळा, मुर्ती, सिंधी, नलफडी आदी गावातील विद्यार्थी शिकण्याकरिता येतात. सध्या या शाळेत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत २७१ विद्यार्थी शिकत आहेत. मागील वर्षी या शाळेतील बारावीचा निकाल ९४ टक्के लागला होता. आॅगस्ट २०१५ ला प्रभारी मुख्याध्यापक एन.आर. बोभाटे यांनी पदबार स्वीकारल्यानंतर या शाळेची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर, बी.डी.ओ. राजुरा, शाळा व्यवस्थापन समिती व पालकवर्गच्या सहकार्याने या शाळेला प्रथम डिजिटल शाळा होण्याचा गौरव प्राप्त झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसहभागातील २१ मराठी माध्यमिक शाळांपैकी प्रथम डिजिटल शाळा विहीरगाव मराठी माध्यमिक शाळा म्हणून गौरविण्याकरिता स्वत: मुख्य कार्यपालन अधिकारी एम.डी. सिंह राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामावत व पाणबुडे यांनी शाळेला भेट दिली. या भेटीत एम. डी. सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा स्पर्धात्मक युगात अवांतर वाचनाला भर देण्याचा सल्ला दिले.
यावेळी मुख्याध्यापक एन.आर. बोभाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंता साळवे, सरपंच प्रतिभा करमनकर, उपसरपंच ईशाद शेख, शाळेचे शिक्षक एस.के. शुक्ला, पी.एन. कटाईत, एस.एन. चलाख, एम.बी. नैताम, सय्यद जाकीर, गिरसावळे, रमेश सोनवणे, किरण सहारे, करिश्मा चिडे, करडभुजे, सोनल भलमे, बंडू चौधरी आणि विलास दानव यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
दुचाकीस्वार गंभीर
घुग्घुस: एक युवक वणीकडून दुचाकी क्र. एमएच २९ एफ ८२३७ या वाहनाने स्वगावी नागाळाकडे परत जात होता. त्यावेळी चंद्रपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपनजीक दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. महेंद्र वाटेकर (३५) रा. नागाळा असे जखमीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमीला चंद्रपूरला औषधोपचाराकरिता पाठविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: 21 Marathi schools will be digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.