शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

२०११ नंतरच्या झोपड्यांना प्रक्रियेतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:50 IST

केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्याची घोषणा केली. मात्र, १ जानेवारी २०११ नंतरच्या अतिक्रमित भूखंड धारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्याच्या विशेष मोहिमेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील निवासी भागात अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बांधणाऱ्या शेकडो कुंटुंबीयांना घरकूलपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीरतेचा ठपका : मिळणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्याची घोषणा केली. मात्र, १ जानेवारी २०११ नंतरच्या अतिक्रमित भूखंड धारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्याच्या विशेष मोहिमेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील निवासी भागात अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बांधणाऱ्या शेकडो कुंटुंबीयांना घरकूलपासून वंचित राहावे लागणार आहे.केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी हद्दीत अतिक्रमण करून झोपड्या बांधून राहणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री घरकूल योजनेचा लाभ मिळत नाही. वनविभागाची जमीन वगळून शासनाच्या विविध विभाग अंतर्गत येणाºया नागरिक क्षेत्रातील जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधून राहणाºया कुटुंबांचा संख्या बरीच आहे. या भूखंडांना नियमानुकूल करून नागरी मूलभूत सोईसुविधा मिळाव्यात, याकरिता अतिक्रमणधारकांनी महानगरपरिषद, नगरपरिषद व नगरपंचायत अनेकदा मोर्चे काढले. निवेदने देऊन समस्येकडे लक्ष वेधले. परंतु, यावर मागील चार वर्षांपासून सरकारने निर्णय घेतला नव्हता. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १ जानेवारी २०११ पूर्वीची सर्व अतिक्रमित जमिनीची प्रकरणे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी भागातील जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहणाºया नागरिकांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त अथवा प्रकरणपरत्वे नगरपरिषद किंवा मुख्याधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. नगर २२विकास विभाग सहाय्यक संचालकांच्या सल्ल्याने सदर अतिक्रमणे नियमानुकूल केल्या जातील. १ जानेवारी २०११ च्यापूर्वीच्या अतिक्रमित भूखंडाना नियमित करून नागरी भागामध्ये घरकूल देण्यात येणार आहे. मात्र २०११ नंतरच्या नागरी क्षेत्रातील निवासी अतिक्रमित भूखंडांना बेकायदेशीर ठरविल्याने घरकुल मिळणार नाही.भरावा लागेल अधिशुल्क५०० चौरस फुटापेक्षा अधिक परंतु एक हजार चौरसफुटापर्यंत जमिनीवर प्रचलित दर मूल्यानुसार १० टक्के आणि एकहजार चौरस फुटापेक्षा अधिक जागेकरिता कब्जेहक्क म्हणून २५ टक्के अधिशुल्क अतिक्रमण धारकाकडून वसूल केले जाणार आहे. भूखंड कायदेशीर झाल्यानंतरच घरकूल योजनेचा लाभ मिळेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिशुल्कातून सूट देण्यात आली.दीड हजार फुटांची मर्यादानागरी भागात अतिक्रमण केलेल्या कमाल दीड हजार फुट भूखंडालाच नियमानुकूल केल्या जाणार आहे. अशा अतिक्रमणधारकांना भोगवटदार वर्ग दोनमध्ये सामाविण्यात येईल. दीड हजारपेक्षा अधिक भूखंड असल्यास संबंधित कुटुंबाला त्यावरील हक्क सोडावा लागेल.