२० वर्षांपूर्वीचे समाज मंदिर धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST2021-02-27T04:36:32+5:302021-02-27T04:36:32+5:30

सिंदेवाही : राष्ट्रीय महामार्गावर असलेले समाज मंदिर २० वर्षांपासून डौलात उभे आहे. मात्र, काही वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने समाज ...

20 years ago Samaj Mandir in the dust | २० वर्षांपूर्वीचे समाज मंदिर धूळखात

२० वर्षांपूर्वीचे समाज मंदिर धूळखात

सिंदेवाही : राष्ट्रीय महामार्गावर असलेले समाज मंदिर २० वर्षांपासून डौलात उभे आहे. मात्र, काही वर्षांपासून दुर्लक्षित असल्याने समाज मंदिर धूळखात पडले आहे. अनावश्यक झुडपांचा विळखा पडला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या समाज मंदिराचे पूर्वी तालुक्यातील एकमेव सभागृह म्हणून ओळख होती. श्री सोमेश्वर महाराज मंदिर देवस्थान परिसरातील समाज मंदिर गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना कमी खर्चात उपयोगी पडणारे होते. ग्रामपंचायतीच्या मार्फत त्याची देखभाल व काळजी घेणे सुरू होते. नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरिता या समाज मंदिराचा उपयोग केला जात होता. नाट्यकलावंत, सिनेस्टार, राजकीय पुढारी, गोरगरीब व श्रीमंतांच्या कार्यक्रमाची समाज मंदिर एक शहराची शान म्हणून ओळखले जात होते. आता या समाज मंदिराची अवस्था बिकट झाली आहे. टीन शेड फुटले आहे. भिंतीला तडे गेलेले आहेत. वाल कंपाउंडला छिद्र पडले आहेत. झुडपांचा विळखा पडला आहे. या समाज मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

Web Title: 20 years ago Samaj Mandir in the dust