शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अन् ‘त्या’ २० बेरोजगारांना मिळाला रोजगार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कल्पना

By परिमल डोहणे | Updated: February 18, 2024 15:21 IST

प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या २० उमेदवारांना चंद्रपूर, नागपूरसह परराज्यातील नामांकित ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूरतंर्गत वनपरिक्षेत्र चिचपल्लीमधील मौजा-उथळपेठ येथील बेरोजगारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातर्फे वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यातर्फे २० बेरोजगारांना १ महिना १५ दिवसांचे हाऊस किपिंगचे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या २० उमेदवारांना चंद्रपूर, नागपूरसह परराज्यातील नामांकित ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे.

वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून निसर्ग पर्यटनस्थळ उथळपेठ (इको टुरिझम) साकारण्यात येत आहे. या गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर. वेलमे, जानाळ्याचे वनरक्षक आर. जे. गुरनुले यांनी पुढाकार घेऊन उथळपेठ व सभोवतालचे गावातील सुशिक्षित २० युवकांची निवड केली.

वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे २० सुशिक्षित बेरोजगारांना वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यामार्फत १ महिना १५ दिवसा हाऊस किपिंगचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्याआधारावर त्या २० ही तरुणांना महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विविध हॉटेलमध्ये हाऊस किपिंगकरिता निवड झाली आहे.

यांची झाली निवड

आकाश मोहुर्ले, चिरोली, लोकेश सुरपाम, चिचपल्ली, विपीन मोहुर्ले, कांतापेठ, सिद्धार्थ वाळके, नलेश्वर, स्वप्निल सातपुते उथळपेठ यांना रामोजी फिल्म सिटी, हैद्राबाद येथे निवड झाली. प्रणय मोहुर्ले चिरोली, वैभव जंपलवार चिरोली, सोमेश्वर मोहुर्ले, खेमेश्वर रविंद्र सातपुते उथळपेठ, सतीन सोनवानी कांतापेठ, अमित मांदाडे कांतापेठ, योगेश मांदाडे कांतापेठ, सूरज भेंडारे, साहिल मेश्राम यांची ताडोबा येथे तर राजकुमार देऊरमले उथळपेठ, सलीम मडावी नलेश्वर, मयूर झाडे नलेश्वर, श्रीकांत सातपुते उथळपेठ यांची नागपूर, काशिनाथ कुळमेथे, प्रफुल गेडाम यांची गोवा येथे निवड झाली आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील उथळपेठ परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या दृष्टीने हाऊस किपिंगचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वितरित केले होते. त्याआधारावर त्या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना चंद्रपूर, नागपूरसह परराज्यात रोजगार मिळाला आहे. -प्रियंका वेलमे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली

टॅग्स :Employeeकर्मचारी