२० हजार ६०१ आदिवासी बांधवांना मिळाले खावटी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:20+5:302021-07-23T04:18:20+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन सिंदेवाही तालुक्यातील ...

20 thousand 601 tribal brothers received khawati grants | २० हजार ६०१ आदिवासी बांधवांना मिळाले खावटी अनुदान

२० हजार ६०१ आदिवासी बांधवांना मिळाले खावटी अनुदान

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील आदिवासी आश्रमशाळेत करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार, सिंदेवाहीचे तहसीलदार सोनवणे, संवर्ग विकास अधिकारी भस्मे, जि. प. सदस्य रमाकांत लोधे, रूपा मसराम, सहायक प्रकल्प अधिकारी बावणे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी घुगे यांनी केलेे. संचालन डी. के. जांभुळे, आभार एस. सी. डोंगरे यांनी मानले. यावेळी विस्तार अधिकारी मडकाम, गेडाम, आश्रमशाळेचे प्राचार्य चन्नुरवार, मंगेश पुट्टावार यांच्यासह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title: 20 thousand 601 tribal brothers received khawati grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.