२० लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:59 IST2018-09-02T21:59:04+5:302018-09-02T21:59:20+5:30

नागपूर-चंद्रपूर मूल मार्गावरील ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूसाठा तर नोकरी या गावाजवळ वाहनातून देशी दारू असा एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा भद्रावती पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यातील आरोपी हा अल्पवयीन आहे. दर दुसऱ्या कारवाईतील आरोपी पसार झाला.

20 lakhs of dowry seized | २० लाखांचा दारूसाठा जप्त

२० लाखांचा दारूसाठा जप्त

ठळक मुद्देअल्पवयीन ताब्यात : भद्रावती पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मूल मार्गावरील ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूसाठा तर नोकरी या गावाजवळ वाहनातून देशी दारू असा एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा भद्रावती पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यातील आरोपी हा अल्पवयीन आहे. दर दुसऱ्या कारवाईतील आरोपी पसार झाला.
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर चंद्रपूरकडे येणाºया ट्रॅव्हल्समधून दारूसाठा आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हिंदुस्थान ट्रॅव्हल्स एम. एच. ४० वाय ६५६९ या वाहनाची तपासणी करुन ट्रॅव्हल्सच्या मागच्या डिक्कीतून ७२ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर दुसºया कारवाईत तालुक्यातील घोसरी या मार्गालगत चंदनखेडा येथे पिकअप वाहन एम. एच. ४९, ६१३१ या वाहनाची तपासणी करुन २० लाखांचा देशी दारूसाठा व वाहन ताब्यात घेतले. मात्र यातील आरोपी पसार झाला. या दोन्ही कारवाईत एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
ही कारवाई ठाणेदार बी.डी. मडावी, सपोनि अनिल आळंदे, नरेश शेरकी, राजू बेलेकर, फैयाज शेख, तनूज टेकाम, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, नाना अंगतवार यांनी केली.

Web Title: 20 lakhs of dowry seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.