४० कोटींचा सीएसआर फंड २० कंपन्यांनी बुडविला

By Admin | Updated: March 6, 2016 00:39 IST2016-03-06T00:39:52+5:302016-03-06T00:39:52+5:30

उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कामासाठी खर्च करावी, हा नियम आहे.

20 crores of CSR funds were bundled by 20 companies | ४० कोटींचा सीएसआर फंड २० कंपन्यांनी बुडविला

४० कोटींचा सीएसआर फंड २० कंपन्यांनी बुडविला

बल्लारपूर क्षेत्राचा खर्च मध्यप्रदेशात : संजय धोटे विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार
राजुरा : उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कामासाठी खर्च करावी, हा नियम आहे. परंतु या नियमाला चंद्रपूर जिल्ह्यातील २० उद्योगां ठेंगा दाखविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २० उद्योगांकडे ४० कोटी रुपयांची निधी थकीत असल्याची माहिती आहे.
राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांंनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले असून येत्या ९ मार्चपासून मुंबईत सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न ते लावून धरणार आहेत. सीएसआर योजनेची माहिती लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाला देणे अनिवार्य आहे. भारत सरकारने कलम १३५ अन्वये उद्योगांनी नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च करणे बंधनकारक आहे. रक्कम मुलभूत विकासासाठी खर्च करणे गरजेचे आहे. या सीएसआर फंडाच्या देखरेखीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असते. सन २०१५ मध्ये हा निधी जिल्हा देखरेख समितीकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. परंतु सीएसआर फंड खर्च न केल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 20 crores of CSR funds were bundled by 20 companies