नागरिकांनी थकविले महापालिकेचे २० कोटी ३३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST2021-03-10T04:28:45+5:302021-03-10T04:28:45+5:30

चंद्रपूर : कर वसुलीच्या भरोशावर महापालिकेचा आर्थिक डोलार चालतो. या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. मात्र, मागील काही ...

20 crore 33 lakhs of NMC exhausted by citizens | नागरिकांनी थकविले महापालिकेचे २० कोटी ३३ लाख

नागरिकांनी थकविले महापालिकेचे २० कोटी ३३ लाख

चंद्रपूर : कर वसुलीच्या भरोशावर महापालिकेचा आर्थिक डोलार चालतो. या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. मात्र, मागील काही वर्षांमध्ये नागरिकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी सद्यस्थितीत २० कोटी ३३ लाख रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे भविष्यात विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिकेने आता कर वसुलीसाठी सक्त पाऊल उचलणे सुरू केले आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत ८७ हजार करधारक असून, त्यांच्याकडून दरवर्षी ५२ कोटी २६ लाख रुपयांचा कर वसूल होणे अपेक्षित आहे. मात्र, यातील तब्बल २० कोटी ३३ लाख रुपये कर थकविण्यात आला आहे. तर ३१.९२ लाख रुपये चालू वर्षातील कर वसूल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत १८ कोटी ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कोरोना काळात अनेकांनी कर भरला नाही. परिणामी थकीत करामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कर वसुलीत सुलभता व्हावी, यासाठी २०१९ - २० पर्यंतचा थकबाकी तसेच इतर करांसह २०२०२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची ३१ मार्चपर्यंत एकरकमी रक्कम भरणा केल्यास १०० टक्के शास्तीत सुटण्याचा निर्णयही महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. नागरिकांकडून थकीत तसेच चालू कर वसूल करण्यासाठी महापालिकेने विविध खटाटोप सुरु केले असून, मार्चअखेर मोहीम अधिक गतिमान करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बाॅक्स

मालमत्ताधारक

८७ हजार

एकूण कर

५२.२६ कोटी

थकीत कर

२० कोटी ३३ लाख

चालू कर

३१ कोटी ९२ लाख

वसुली फेब्रुवारी २०२१

१८.९९ कोटी

बाॅक्स

ऑनलाईनही भरता येणार कर

मागील काही वर्षांपासून महापालिकेने ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेषत: मागील वर्षी लाॅकडाऊनमध्ये अनेकांनी ऑनलाईन कर भरला.

बाॅक्स

नागरिकांना मिळणार सूट

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांनी मालमत्ता कर थकीत ठेवला. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी यावर्षी महापालिकेने थकीत रक्कम तसेच चालू वर्षाचा कर एकरकमी भरल्यास शास्तीत सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

बाॅक्स

अनेकांना बजावली नोटीस

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी आता महापालिका प्रशासन कठोर झाले असून, थकीत कर धारकांना नोटीस पाठविणे सुरु केले आहे. प्रभागनिहाय यादी तयार करून संबंधितांना नोटीस पाठविली जात आहे.

Web Title: 20 crore 33 lakhs of NMC exhausted by citizens