ब्रह्मपुरीतील रस्त्यांसाठी २ कोटी ३५ लाखांचा निधी
By Admin | Updated: March 12, 2016 01:20 IST2016-03-12T01:20:01+5:302016-03-12T01:20:01+5:30
नगर परिषदेच्या इतिहासात कधी नव्हे एवढा निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने व माजी आ. अतुल देशकर,...

ब्रह्मपुरीतील रस्त्यांसाठी २ कोटी ३५ लाखांचा निधी
ब्रह्मपुरी : नगर परिषदेच्या इतिहासात कधी नव्हे एवढा निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने व माजी आ. अतुल देशकर, नगराध्यक्ष रीता उराडे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे. रस्ते विकास निधी अंतर्गत विशेष अनुदान म्हणून २ कोटी ३५ लाख मंजूर झाले असून या निधीतून ब्रह्मपुरी शहरातील रस्त्यांची सुधारणा व नवीन रस्ते बांधकाम होणार आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेवर ब्रह्मपुरीकरांची नेहमीच ओरड राहिली आहे. परंतु, आजपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्न झाले नाही. नगर परिषदेत सत्ता भाजप आली व राज्यातही भाजपची सत्ता असल्याने माजी आ. अतुल देशकर व नगराध्यक्ष रिता उराडे यांनी रस्ते कामासाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे दोन कोटी ३५ लाखाचा विशेष निधी रस्त्यांसाठी मंजूर झाला आहे.
इतर नगर पालिकांपेक्षा ब्रह्मपुरी पालिकेला भरीव निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने शहरवासींयात आनंद पसरला आहे. या निधीअंतर्गत जो भाग मागासलेला आहे, अशा भागात रस्त्यांचा विकास करून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा प्रयत्न होणार आहे. निधी मिळाल्याबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक उराडे, शहर प्रमुख जगदिश तलमले, मनोज वठे, मनोज भूपाल, हेमलता नंदूरकर, विक्रम कावळे, संजय बावनकुळे, प्रशांत ताम्हण आदीने आभार मानले आहे. (तालुका प्रतिनिधी)