बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रासाठी १८.७८ कोटींचा निधी

By Admin | Updated: April 18, 2016 01:03 IST2016-04-18T01:03:51+5:302016-04-18T01:03:51+5:30

वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे स्थापन करण्यात येत

18.78 crores fund for Bamboo Research Training Center | बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रासाठी १८.७८ कोटींचा निधी

बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रासाठी १८.७८ कोटींचा निधी

चंद्रपूर : वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे स्थापन करण्यात येत असलेल्या बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम, मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, अंतर्गत रस्त्याचे बांधकाम याबाबतच्या अंदाजपत्रकांना महसूल व वनविभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात एकुण १६ कोटी ७८ लक्ष ७२ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी वनमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच मंत्रीमंडळाने चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या बांबू संधोशन व प्रशिक्षण केंद्रासाठी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी १२ लक्ष ३६ हजार रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी ७५ लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
या केंद्राच्या अंतर्गत रस्त्याच्या बांधकामासाठी २ कोटी ४३ लक्ष रुपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या केंद्रात मुलांच्या वसतीगृहाचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी सात लाख ५३ हजार रूपये तर मुलींच्या वसतीगृहाचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी ४० लाख ८३ हजार रूपये किमतीच्या अंदाजत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यासंदर्भात महसूल व वनविभागातर्फे ९ मार्च व १० मार्चला शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. चिचपल्ली येथील बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्र उत्तम दर्जाचे व्हावे, आणि त्या माध्यमातून बांबु संशोधन व प्रशिक्षणाची प्रक्रीया उत्तमरित्या पार पाडावी, यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष देणार असुन याबाबत निधीची कोणतीही कमतरता भासु देणार नाही, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

उन्हामुळे चंद्रपुरातील रस्त्यांवर शुकशुकाट
चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील पारा चढतीवर आहे. रविवारी येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपेक्षा हे तापमान दोन अंशाने अधिक होते. दुपारच्यावेळी तिव्र उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. सूर्यास्तानंतरही वातारणात उष्ण लाट होती. रविवारी येथे नोंद करण्यात आलेले तापमान राज्यात सर्वाधिक होते. (प्रतिनिधी)

Web Title: 18.78 crores fund for Bamboo Research Training Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.