१८ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

By Admin | Updated: September 5, 2015 01:07 IST2015-09-05T01:07:44+5:302015-09-05T01:07:44+5:30

खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या

18 patients infected with gastro | १८ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

१८ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा : अमरपुरी भान्सुलीत रुग्णांच्या संख्येत वाढ
खडसंगी : खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी पिल्याने मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची (अतिसार) लागण झाली असून आजपर्यंत १८ रुग्ण खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गटग्रामपंचायत अमरपुरी (भान्सुली) ची लोकसंख्या अंदाजे दोन हजारांच्या जवळपास आहे. गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची नळयोजना नसल्याने पूर्ण गावाला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विहिरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकणे गरजेचे असते तर विहिरीच्या स्त्रोतामध्ये दुसऱ्या ठिकाणाचे दूषित पाणी येत तर नाही याची दक्षता स्थानिक ग्रामपंचायतीने घ्यायला हवी. मात्र मागील अनेक दिवसांपासून विहिरीत ब्लिचींग पावडर न टाकल्याने व बाजुला संडासचे गटर असल्याने या विहिरीचे पाणी दूषित झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. अनिल देवराव घोगडे (३५), शिवाणी संपत नन्नावरे (४), सुहासिनी हरिदास जांभुळे हे रुग्ण खडसंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. रेखा तुळशीराम श्रीरामे (३०), बाळू देवराव दडमल (३५), सुमन रामदास ताजने (५०), पीयूष तुळशिराम श्रीरामे (५), वंदना वामन घेताडे (४५), मंगेश महादेव दडमल (२५), अरुण कवडू श्रीरामे, किरण नन्नावरे (२५), मनिषा रविंद्र श्रीरामे (२०), मंजुळा महादेव दडमल (४५), लक्ष्मण सातपैसे (५०), विनोद सातपैसे (२५), प्रदीप गायकवाड (२१), वेदांत शांताराम ताजने (५०), आणि संगीता संदीप समर्थ यांचा समावेश आहे. हे सर्वजण अमरपुरी भान्सुलीचे रहिवासी आहे. त्यांच्यावर चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर एवढे रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली नसती. त्यामुळे याकरीता आरोग्य विभागाचा अलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता व ब्लिचींग पुरवठा वेळेवर केला असता तर गॅस्ट्रोची लागण झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: 18 patients infected with gastro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.