२४ तासांत १७२८ पॉझिटिव्ह तर ३४ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:35+5:302021-04-26T04:25:35+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत ७०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १७२८ ...

२४ तासांत १७२८ पॉझिटिव्ह तर ३४ मृत्यू
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत ७०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १७२८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ८४० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३६ हजार ४१५ झाली आहे. सध्या १५ हजार ६३७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन लाख ५७ हजार २६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ९८ हजार ४२८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बॉक्स
असे आहेत मृत
रविवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील ३५, ३९ व ४१ वर्षीय पुरुष, ७२ व ५५ वर्षीय महिला, ऊर्जानगर येथील ४६ वर्षीय पुरुष, ताडाळी येथील २५ वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ६२ वर्षीय पुरुष, श्रीराम वाॅर्ड येथील ७५ वर्षीय महिला, दुर्गापूर येथील ६८ वर्षीय महिला, घुग्घुस येथील ५७ वर्षीय महिला, वणी येथील ४६ व ५० वर्षीय पुरुष, जिवती येथील ५६ वर्षीय पुरुष, वरोरा येथील ४०, ४८, ४९, ६० व ६३ वर्षीय पुरुष, शेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ६४ वर्षीय दोन महिला, बामणी येथील ४७ वर्षीय महिला, भद्रावती येथील ५४ वर्षीय पुरुष, चिमूर भिसी येथील ४७, ५५ व ६० वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ६० वर्षीय पुरुष, नागभीड येथील ५५ व ६५ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, तर यवतमाळ येथील ७१ वर्षीय महिलेचा व आरमोरी गडचिरोली येथील ३२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७८८ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७२५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २६, यवतमाळ २५, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
बॉक्स
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र- ५१२
चंद्रपूर तालुका-७४
बल्लारपूर-१०६
भद्रावती- ८६
ब्रह्मपुरी- १०७
नागभीड १०९
सिंदेवाही- ७७
मूल- ९३
सावली-१३
पोंभुर्णा-१३
गोंडपिपरी-२८
राजुरा-१०९
चिमूर- ५१
वरोरा- १७२
कोरपना-१५०
जिवती- ११
इतर -१७