१७ गावांची पाणी पुरवठा योजना कुचकामी
By Admin | Updated: October 21, 2015 00:54 IST2015-10-21T00:54:10+5:302015-10-21T00:54:10+5:30
कोरपना तालुक्यातील पाणी टंचाई निर्मूलनासाठी १० वर्षांपूर्वी ५४ गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ...

१७ गावांची पाणी पुरवठा योजना कुचकामी
महिलांचा पाण्यासाठी टाहो : कवठाळावासीयांचा आंदोलनाचा इशारा
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील पाणी टंचाई निर्मूलनासाठी १० वर्षांपूर्वी ५४ गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, जलस्वराज, राष्ट्रीय पेयजल आदी योजनांमधून कोट्यावधी रुपये खर्चून पाण्याची सोय करण्यात आली. मात्र सदर योजनेतील पाईप लाईन, विद्युत मीटर, नळ, पाणी साठा याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या योजनांपैकी कवठाळा-भोयगाव-भारोसा, नांदगाव, बाखर्डी, बोरगाव, गाडेगाव-विरुन आदी १७ गावांतील पाणीपुरवठा गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. कवठाळा येथे या योजनेतील पाणी साठवण केंद्र आहे. मात्र यामध्ये पाणी साठविले जात नसून विद्युत मोटारीत तांत्रिक अडचण असल्याचे गावकरी सांगत आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. सदर योजनेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र संबंधित विभाग नळयोजनेतील डागडूजी आणि नियंत्रण ठेवत नसल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही. (वार्ताहर)