रेती तस्करीचे १७ ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST2021-01-24T04:12:21+5:302021-01-24T04:12:21+5:30

वरोरा : मागील काही महिन्यांपासून रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी जंगलातील ...

17 tractors of sand smuggling seized | रेती तस्करीचे १७ ट्रॅक्टर जप्त

रेती तस्करीचे १७ ट्रॅक्टर जप्त

वरोरा : मागील काही महिन्यांपासून रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी जंगलातील नाल्यातील रेती अवैधपणे वाहतूक करणे सुरू केले आहे. याविरोधात वनविभागाने कारवाई करीत रेती वाहून नेणारे तब्बल १७ ट्रॅक्टर जप्त केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात मोठे नाले आहेत. त्यातील माती सुपीक असल्यामुळे रेती तस्करांनी आपला मोर्चा जंगलातील रेतीकडे वळविला आहे. त्यावर वनविभागाने अंकुश लावत व्यापक मोहीम राबवित जंगलातून अवैधरीत्या वाहतूक करणारे १७ ट्रॅक्टर जप्त केले. त्यात वनविभागाला दंडापोटी लाखो रुपयांचा महसूल मिळणार आहे. ही मोहीम वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी एम.पी. राठोड यांच्या नेतृत्वात वनपाल विजय रामटेके, विजय उराडे, एम.एन. निबुदे, वनरक्षक व्ही.आर. मुंडे आदींनी केली.

Web Title: 17 tractors of sand smuggling seized