१७ हजार कुटुंबांना मिळाले गॅस

By Admin | Updated: October 21, 2015 00:55 IST2015-10-21T00:55:59+5:302015-10-21T00:55:59+5:30

वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी ...

17 thousand families got gas | १७ हजार कुटुंबांना मिळाले गॅस

१७ हजार कुटुंबांना मिळाले गॅस

२ हजार ५०० हेक्टरवर रोपवन लागवड : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमींना १ कोटी ७९ लाखांचे अर्थसहाय्य
चंद्रपूर : वनालगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वृक्षतोड थांबविण्यासाठी तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या असून वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सन २०१०-११ ते २०१४-१५ या वर्षात १७ हजार ५०४ कुटूंबांना घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात आला आहे. तर वन्यप्राण्यांच्या हल्यात झालेल्या नुकसानीपोटी चालू वर्षांत एप्रिल ते आॅगष्ट पर्यंत विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य वनविभागातर्फे वितरीत करण्यात आले आहे.
चंद्रपूर वनवृत्तांतर्गत असलेल्या मध्य चांदा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात ४३३ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, ग्रामस्थांना सवलतीच्या दरात ७५ टक्के अनुदानावर गेल्या तीन-चार वर्षात शासनाच्या विविध योजनेतून आदिवासी अनुसूचित जमाती इतर प्रवर्गातील कुटुंबांना स्वयंपाक गॅसचे पुरवठा करण्यात आलेला आहे.
त्यामुळे गावकऱ्यांची दैनंदिन गरजासाठी वनक्षेत्रात जाणे कमी होत असून काही प्रमाणात वनावरचा ताण कमी होण्यास सहाय्यभूत ठरलेले आहे. त्यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण होवून गावकऱ्यांची वन व वन्य प्राण्यांबाबत आस्ता वाढलेली आहे. सन २०१०-११ ते २०१४-१५ पर्यंत एकूण १७ हजार ५०४ कुटूंबाना गॅसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार पहिल्या वर्षी १२ सिलिंडर करीता ७५ टक्के अनुदानाचा सुध्दा समावेश आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने सन २०१४-१५ मध्ये ५ हजार १३१ प्रकरणात २ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आलेले आहे. तसेच सन २०१५-१६ मध्ये एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत आर्थिक सहाय्य वाटप करण्यात आले आहे. यात मनुष्य हानी, जखमी, पशुधन हानी, शेतपीक हानी, पशुधन जखमी अशा विविध ३ हजार ९७१ प्रकरणात १ कोटी ७९ लाख २० हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. सन २०१५ तेंदू हंगामातंर्गत चंद्रपूर वनवृत्तातील एकूण ७० तेंदू घटक विक्रीकरीता ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ तेंदू घटकाची विक्री झाली आणि ५ कोटी ९० लाख १० हजार रुपये प्राप्त झाले.

रोप लागवडीद्वारे १ लाख ३५ हजार
दिवस मनुष्य निर्र्मिती
सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन व विकास परिषद, कॅम्पा व जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट बंधारे, दगडी बंधारे, वनतलाव, गॅबियन व अनघड बंधारे असे एकूण २ हजार ४९० च्या कामास ६ कोटी रुपये निधी खर्च झाला. त्यापासून २ लाख २ हजार मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. सदर कामे पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर पूर्ण झालेले असल्यामुळे वन्यप्राण्यास व वनास त्याचा फायदा होणार आहे. सन २०१५ च्या पावसाळ्यात विविध योजने अंतर्गत एकूण २४५६ हेक्टर क्षेत्रात २३ लाख ४४ हजार रोपांची लागवड करण्यात आलेली असून त्यावर ४ कोटी ३ लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यापासून १ लाख ३५ हजार मनुष्य निर्मिती झाली आहे.

Web Title: 17 thousand families got gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.