जिल्ह्यात हिंदू धर्मीय १७ लाखांवर

By Admin | Updated: August 29, 2015 01:13 IST2015-08-29T01:13:39+5:302015-08-29T01:13:39+5:30

सन २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिश्नर कार्यालयाने मंगळवारी जारी केली.

17 million Hindus in the district | जिल्ह्यात हिंदू धर्मीय १७ लाखांवर

जिल्ह्यात हिंदू धर्मीय १७ लाखांवर

धर्मनिहाय जनगणना : बौद्ध धर्मीय लोकसंख्या दुसऱ्या तर मुस्लीम धर्मीय तिसऱ्या स्थानी
लोकमत विशेष
चंद्रपूर : सन २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिश्नर कार्यालयाने मंगळवारी जारी केली. यात चंद्रपूर जिल्ह्याची शहरी व ग्रामीण लोकसंख्या २२ लाख ४ हजार ३०७ असून यात हिंदूंचा टक्का वाढलेला आहे. जिल्ह्यात हिंदू नागरिकांची लोकसंख्या १७ लाख ८० हजार ८५ आहे. तर मुस्लीम लोकसंख्या ९२ हजार २९७ आहे. ख्रिश्चन लोकसंख्या १० हजार ७0१, शिखांची ५ हजार २५१ तर बौध्द धर्मीय लोकसंख्या २ लाख ८६ हजार ७३४, जैन समाजाची लोकसंख्या ३ हजार ८६१ व जातीधमार्चा उल्लेख न करणाऱ्या नागरिकांची संख्या २ हजार १९० व अन्य धर्मीयांची लोकसंख्या २३ हजार १८८ एवढी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ०४ हजार ३०७ लोकसंख्यपैकी ७ लाख ७५ हजार ३७८ लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणारी आहे. तर १४ लाख २८ हजार ९२९ लोकसंख्या ही शहरी भागात राहणारी आहे. या लोकसंख्येत ११ लाख २३ हजार ८३४ पुरूष, १० लाख ८० हजार ४७३ महिला असून त्यातील ७ लाख २६ हजार १०६ पुरूष हे शहरी तर ७ लाख २ हजार ८२३ महिला शहरी भागात राहणाऱ्या आहते. ३ लाख ९७ हजार ७२८ पुरूष व ३ लाख ७७ हजार ६५० महिला या ग्रामीण भागात राहणारे आहे.
दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचे काम सुरू असताना विविध संघटना तसेच सामाजिक संस्थांनी नागरिकांना जातीचा उल्लेख करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर जनगणना प्रगणकाकडे जातीचा उल्लेख करून माहिती भरण्यात आली. त्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने हा डाटा तयार केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू लोकसंख्येसोबतच ख्रिश्चन, मुस्लीम समाजाची लोकसंख्या बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. दुर्गम असलेल्या अनेक तालुक्यांमध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला असल्याचे या धर्मनिहाय जनगणनेवरून स्पष्ट झाले आहे.
धर्म न सांगणाऱ्यांची संख्या २ हजार १९० एवढी असून यांनी कोणत्याच धर्माचा उल्लेख केलेला नाही. शहरातील लोकसंख्या वाढत असून अनेक नागरिक रोजगारासाठी शहरात येऊन वास्तव्याला राहत असल्याचे मुख्य कारण आहे. यावरूनच शहरी लोकसंख्या वाढत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 17 million Hindus in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.