167 new positive deaths in 24 hours | २४ तासात १६७ नव्याने पॉझिटिव्ह, चाैघांचा मृत्यू

२४ तासात १६७ नव्याने पॉझिटिव्ह, चाैघांचा मृत्यू

ठळक मुद्देआतापर्यंत १७ हजार ९०४ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील  २४ तासात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला १६७ नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत बाधीत झालेल्यांची एकूण संख्या २० हजार ११५ वर पोहोचली आहे.
 ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ९०४ कोरोनामुक्त झाले.  सध्या एक हजार ९०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५०  हजार ९४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख २८ हजार ४०८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. 
मंगळवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये कटवाल भद्रावती येथील ५९ वर्षीय महिला, वडगाव चंद्रपूर येथील  ६२ वर्षीय पुरूष, चिंचाळा, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष तसेच सावरघाटा, सिंदेवाही येथील ४१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी  जिल्ह्यातील २८३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आढलेल्या १६७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ६६, चंद्रपूर तालुक्यातील ११, बल्लारपुर तालुक्यातील १५, भद्रावती ११, ब्रम्हपुरी दोन, सिंदेवाही एक, मूल १२, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा १०, चिमूर चार, वरोरा २७, कोरपना एक व इतर ठिकाणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 167 new positive deaths in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.