वन प्रबोधिनीतील तीन इमारतींच्या नूतनीकरणासाठी १६ कोटींचा निधी मंजूर

By Admin | Updated: March 3, 2016 01:14 IST2016-03-03T01:14:07+5:302016-03-03T01:14:07+5:30

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साकारत असलेल्या चंद्रपूर येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण,

16 crores grant for the renovation of three buildings of Forest Academy | वन प्रबोधिनीतील तीन इमारतींच्या नूतनीकरणासाठी १६ कोटींचा निधी मंजूर

वन प्रबोधिनीतील तीन इमारतींच्या नूतनीकरणासाठी १६ कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्र्यांचा पुढाकार : राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता
चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साकारत असलेल्या चंद्रपूर येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण, प्रेक्षकगृह इमारतीचे नूतनीकरण, संचालक निवासस्थान इमारतीचे बांधकाम आणि प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी १६ कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाची धुरा सांभाळताच चंद्रपूर येथे वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या प्रबोधिनीच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी ४.८० कोटी, प्रेक्षकगृह इमारतीच्या नूतनीकरणासाठी ४.३३ कोटी, संचालकांच्या निवासस्थान बांधकामासाठी १.८५ कोटी, वसतिगृह इमारतीच्या नूतनीकरणासाठी ४.८४ कोटी किमतीच्या अंदाजपत्रकाला महसूल व वन विभागाने १ मार्चच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना सर्व सोयी सुविधांनी युक्त उच्चतम व आरामदायी निवास व्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देऊन वन विभागासाठी सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने या वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये अस्तित्वात असलेल्या इमारतींचे नुतनीकरण, आधुनिकीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यामध्ये वन अकादमीचा संकल्पित आराखडा, प्रकल्प व्यवस्थापन समिती गठित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 16 crores grant for the renovation of three buildings of Forest Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.