१६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST2021-02-13T04:27:24+5:302021-02-13T04:27:24+5:30
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार १९१ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७१५ झाली आहे. सध्या ...

१६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार १९१ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७१५ झाली आहे. सध्या ८३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख पाच हजार ६०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८० हजार ५७८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या १६ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १२, नागभीड एक, वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना आजार गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.