१५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By Admin | Updated: September 5, 2015 00:55 IST2015-09-05T00:55:57+5:302015-09-05T00:55:57+5:30
जिल्हा परिषदेकडून १५ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी होणाऱ्या एका समारंभात ....

१५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
चंद्रपूर : जिल्हा परिषदेकडून १५ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी होणाऱ्या एका समारंभात या सर्व शिक्षकांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. माध्यमिक गटातून मनोज भैसारे (जि.प. ज्युबिली हायस्कूल) यांची एकमेव निवड झाली आहे. प्राथमिक शिक्षक विभागातून अनिल दागमवार (घुग्घुस), विलास कुळमेथे (मुरसा), किशोर नागदेवते (चिखलपार), खुशाल मदनकर (पळसगाव खु.), राजेश्वर सहारे (जुगनाळा) सुरेश राऊत (रत्नापूर), मनीषा धोंड (चांदापूर), देवेंद्र रायपुरे, (किसाननगर), राजेश वाग्दरकर (आंबधानोरा), किशोर भोयर (चेबेरडी), बाबूराव पहानटे (सास्ती), सुधाकर मडावी (हिरापूर), शत्रुघ्न गाऊत्रे (कुंभेझरी), गजानन ाम चिंचोलकर (गिलबिली) यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)