नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:51+5:30

जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.

15 out of 23 new samples negative | नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह

नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देआठ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : पुढचे काही दिवस संयम पाळा, जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हावासीयांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या गावांमधील नागरिकांनी स्वत:च्या गावाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. गावात येणाºया प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनीदेखील आजूबाजूच्या आजारी व संशयित रुग्णांबाबत जागरूकता बाळगावी. वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी. सध्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पुढील काही दिवस घराबाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.
नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने गरजेसाठी आठवडयातून एकदाच बाहेर पडण्याची सवय लावावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभागाचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन २३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १५ नमुने निगेटिव आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
महानगरपालिकेकडून दररोज निराधार, गरीब कुटुंबांना अन्न पुरविले जात आहे.

जिल्ह्यात ४१ निवाराकक्ष
जिल्हा प्रशासनाला एकीकडे आरोग्य यंत्रणा बळकट करताना दुसºया बाजूने लाकडाऊनमुळे अडकून पडलेल्या दुसºया राज्यातील व जिल्ह्यातील शेकडो लोकांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांसह प्रमुख शहरांमध्ये ४१ निवारा कक्ष उघडण्यात आले आहे. यामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या राहण्याची अंथरूण-पांघरूणाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच जे बेघर आहेत. विमनस्क, एकटे व ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याची यंत्रणाच नाही, अशा नागरिकांसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्या मदतीने महानगरपालिकेच्या नियोजनात कम्युनिटी किचन अविरत सुरू आहे.

जिल्ह्यात १०३ जण नव्याने क्वारंटाईन
जिल्ह्यातील १०३ जणांना गुरुवारी नव्याने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर-६, वरोरा-१५, पोंभूर्णा-४, जिवती-२०, बल्लारपूर-२८, गोंडपिपरी-६ व ब्रह्मपुरीतील २४ जणांचा समावेश आहे.

१९,९९० जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण
जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बाहेर देशातून व अन्य राज्यातून, अन्य जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची संख्या २६ हजार ५३६ आहे. सध्या निगराणीमध्ये असणाºया प्रवाशांची संख्या ६५४६ आहे. १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या १९ हजार ९९० आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची संख्या २० आहे. आरोग्य विभागांचा जिल्ह्यामध्ये कसून सर्वे सुरू असल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

३५ लोकांना अटक
संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत ३५ लोकांना अटक करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या ९६ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २१५ वाहने ताब्यात घेण्यात आले असून चार लाख ४२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: 15 out of 23 new samples negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.