पशुधन विकासासाठी दीड कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:55 IST2018-03-13T23:55:31+5:302018-03-13T23:55:31+5:30

जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) सीएसआर निधीतून दीड कोटींचा निधी देण्यात आला. अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जे. के. ट्रस्ट यांना दीड कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यात आला.

1.5 crore fund for livestock development | पशुधन विकासासाठी दीड कोटींचा निधी

पशुधन विकासासाठी दीड कोटींचा निधी

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : जेएनपीटीकडून सीएसआर निधी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) सीएसआर निधीतून दीड कोटींचा निधी देण्यात आला. अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जे. के. ट्रस्ट यांना दीड कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी जेएनपीटीचे व्यवस्थापक नीरज बन्सल, जे. के. ट्रस्टच्या डॉ. प्रिन्सी जॉन आणि डॉ. जयंता हाजारिका उपस्थित होते. जे. के ट्रस्टच्या वतीने चंद्रपूर येथे १५ एकात्मिक पशुधन विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. ही केंद्र मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर तालुक्यात स्थापन करण्यात येणार असून या केंद्रात काम करण्यासाठी स्थानिक स्तरावरून १ गोपाळ नियुक्त केला जाणार आहे. त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
१५ केंद्रांसाठी १५ सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. तर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अंदाजे ८० गावातील शेतकºयांना लाभ मिळणार आहे. या केंद्रात नियुक्त केलेले गोपाळ शेतकºयांच्या घरी जाऊन पशुधन विकास विषयक सेवा पुरवतील. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या पशुधनामध्ये सुधारणा करून दूध उत्पादन वाढविणे, त्यातून शेतकºयाचे उत्पन्न वाढण्यास तसेच बालकांमधील कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांचा असून वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पशुधन विकासासाठी जेएनपीटीने दीड कोटी रुपयांचा निधी सामाजिक दायित्व निधीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल नीरज बन्सल यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांना मिळणार पशुविषयक मार्गदर्शन
पशुधन विकास केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. जनावरांना विविध रोगाची लागण होत असते. मात्र सुविधांअभाी अनेकदा जनावरांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे गोपाळच घरी येवून माहिती देतील.

Web Title: 1.5 crore fund for livestock development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.