१४०० नागरिकांची आरोग्य तपासणी
By Admin | Updated: August 7, 2015 00:08 IST2015-08-07T00:08:28+5:302015-08-07T00:08:28+5:30
लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर व काईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया सिडा स्पेड’ भाग तीन अंतर्गत ...

१४०० नागरिकांची आरोग्य तपासणी
चंद्रपूर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर व काईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया सिडा स्पेड’ भाग तीन अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १४०० रूग्णांची तपासणी करण्यात आली.
संस्थेचे संचालक फा जोबीन यांच्या मार्गदर्शनात कवडजई, पळसगाव, कारवा, निमगट्टा, केमतुकूम, गिलबिली, जुनोना, आसेगाव या गावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराला आरोग्य चिकित्सक डॉ. समिक्षा चांदेकर, डॉ. श्वेता वानखेडे, डॉ. नंदिनी घुंगरुडकर व त्यांची टिम उपस्थित होती.
तर प्रमुख अतिथी म्हणून कवडजई उपसरपंच कल्पना कुकडकर, भास्कर कस्तुरे, पळसगावचे सरपंच ऋषीदेव वासाडे, मुख्याध्यापक शांताराम कुमरे, संजय डोळस, बी.आर. पिपरे, निरांजने, मुख्याध्यापक स्नेहलता वाघमारे, केमतुकूम, अर्चना टेकाम, शालु कांबळे, गीता वाढरे, मुख्याध्यापक गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गावातील १४८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक भास्कर ठाकूर सहसमन्वयक वर्षा दानव, समन्वयक संदीप नळे, समन्वयक सोनिया सुरनापेल्लीवार, सामाजिक कार्यकर्ता सुनंदा देठे, अरुण कस्तुरे, आलाम, विठ्ठल कुळमेथे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)