शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दची दुरुस्ती सुरू होण्यास १४ वर्षे, शेतकऱ्यांमध्ये संताप; पाणी केव्हा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:17 IST

Chandrapur : उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळावे, यासाठी लाभक्षेत्रातील ५६ पाणीवापर संस्थांनी १४ आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदोलन केले होते. आंदोलनानंतरही पॅचमधील कामे बाकी असल्याचे कारण देत विभागाने उन्हाळी सिंचनास नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड (चंद्रपूर):गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला २००९-१० मधील अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. मात्र, या कालव्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले ते तब्बल १४ वर्षांनी, २०२४ मध्ये. अतिवृष्टीत कि.मी. २१, ३१, ३२, ३४, ३९ आणि ४३ या ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण व खोदकाम कमकुवत झाले; पण या मोठ्या नुकसानीकडे पाटबंधारे विभागाने १४ वर्षे दुर्लक्ष केले. पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विभागाच्या या वेळखाऊ धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळावे, यासाठी लाभक्षेत्रातील ५६ पाणीवापर संस्थांनी १४ आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदोलन केले होते. आंदोलनानंतरही पॅचमधील कामे बाकी असल्याचे कारण देत विभागाने उन्हाळी सिंचनास नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांनी '१४ वर्षे नेमके केले काय?' असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे.

नागपूर अधिवेशनात शासन लक्ष देणार काय?

गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना, नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या मुद्द्यावर शासनाचे लक्ष वेधत आहेत. कालव्याची दुरुस्ती सुरू होण्यास १४ वर्षे लागल्याने प्रकल्पाचा लाभ प्रत्यक्षात कथी मिळणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अभ्यासासाठीच ९ वर्षे?

सूत्रांच्या माहितीनुसार, कालव्याचा तांत्रिक १ अभ्यास करण्यासाठी २०१५-१६ मध्ये गांधीनगरमधील एका आयआयटी संस्थेला कंत्राट देण्यात आले. या संस्थेने अहवाल देण्यासाठी किती वेळ घेतला याची स्पष्ट माहिती नाही; मात्र पाटबंधारे विभागाने कामाचा कार्यारंभ आदेश १० ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केला. म्हणजे अभ्यास प्रक्रियेलाच जवळपास नऊ वर्षे लागल्याचे चित्र समोर येते. उजव्या कालव्याच्या काही पॅचमध्ये आढळणारी 'भिसी स्वरूपाची पिवळी माती' हे बांधकामातील मोठे आव्हान असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

"थोडासा पाऊस जरी झाला तरी 'भिसी स्वरूपाची पिवळी माती' पाण्यासारखी बनते. गांधीनगर 'आयआयटी'ने मातीचा अभ्यास करून सूचना दिल्या. त्यानंतर बांधकामाचे डिझाइन, टेंडर प्रक्रिया झाली. खरीप हंगामात कालवा चालू असल्याने प्रत्यक्ष कामाचा कालावधी फक्त सहा महिने मिळतो. त्यामुळे कामांना विलंब होत आहे."- एस. ए. मोरे, कार्यकारी अभियंता, घोडाझरी कालवे विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Gosekhurd Canal Repairs Start After 14 Years, Farmers Angered.

Web Summary : Farmers are outraged as Gosekhurd project canal repairs began after 14 years of neglect following 2009 flood damage. Delays in repairs and study process deny water for summer crops. Farmers question the delay amid Nagpur session focus.
टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पFarmerशेतकरी