जिल्ह्यात नव्याने १४ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST2021-08-28T04:31:42+5:302021-08-28T04:31:42+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच १४ जण ...

14 new corona positive in the district | जिल्ह्यात नव्याने १४ कोरोना पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात नव्याने १४ कोरोना पाॅझिटिव्ह

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच १४ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत; तर ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित झालेल्या १४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, बल्लारपूर ७, भद्रावती २, मुल १, वरोरा १, कोरपना १ रुग्णांचा समावेश आहे. तर चंद्रपूर तालुका, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, जिवती या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६२९ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ४१ झाली आहे. सध्या ४९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सहा लाख ६९ हजार ५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यांपैकी ५ लाख ७८ हजार ३४९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहेत.

Web Title: 14 new corona positive in the district