१४ दिव्यांग जोडपे अडकले विवाहबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:17+5:302021-02-20T05:21:17+5:30
चंद्रपूर : येथील आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा व स्व. गौरवबाबू पुगलिया उपवर वधू सूचक केंद्राद्वारे आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग ...

१४ दिव्यांग जोडपे अडकले विवाहबंधनात
चंद्रपूर : येथील आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा व स्व. गौरवबाबू पुगलिया उपवर वधू सूचक केंद्राद्वारे आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्यात १४ दिव्यांग जोडपे विवाहबंधनात अडकले. येथील गौरव सेलिब्रेशन येथे हा विवाह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्यापूर्वी हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संगीत कार्यक्रमाची मेजवाणी देण्यात आली. त्यानंतर सर्वच जोडप्यांनी महाकाली मंदिरात जावून देवीचे दर्शन घेतले. यानंतर नागरिकांच्या उपस्थितीत विवाह लावून देण्यात आला. नरेंद्र पुगलिया यांनी वधू-वरांना संसार उपयोगी वस्तूंसह वधुवरांना सजविण्यास आवश्यक सर्व साहित्याची व्यवस्था केली. त्यांच्या सर्व मित्रपरिवारांकडून या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सहकार्य लाभले. आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट तसेच पुगलिया परिवारांचे सहकार्य मिळत असल्याचे संस्थेचे सचिव महेश भगत यांनी सांगितले.
विवाह सोहळ्यानंतर संस्थेद्वारे व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केेलेल्या सहा यशस्वी दिव्यांग बांधवांना त्यांचा व्यवसाय उभा होण्याकरिता साहित्य प्रदान करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा.नरेश पुगलिया होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख अतिथी पंकज सपाट, अनिल गुप्ता, अनिल लुनिया, सुभाष शिंदे, महेश उचके, मनिष बोराडे, आशादेवी गोलेच्छा, विभा सहारे, रशिला लुनिया, डाॅ.ऋतुजा मुंधडा, स्मिता ठाकरे आदींची यावेळी उपस्थिती होती.