१४ कोटींचा भेंडाळा प्रकल्प १० वर्षापासून धूळखात
By Admin | Updated: December 23, 2016 00:49 IST2016-12-23T00:49:31+5:302016-12-23T00:49:31+5:30
तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्प अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मागील १० वर्षांपासून रखडला आहे.

१४ कोटींचा भेंडाळा प्रकल्प १० वर्षापासून धूळखात
पत्रकार परिषद : प्रकल्प पूर्ण करण्याची अविनाश जाधव यांची मागणी
राजुरा : तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्प अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मागील १० वर्षांपासून रखडला आहे. हा प्रकल्प १४ कोटी रुपयांचा असून त्याला पुनर्जीवित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे.
या प्रकल्पाची किंमत एक हजार ४५२ लाख असून प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २०१९ पर्यंत आहे. प्रकल्पाील लाभक्षेत्र तीन हजार ९१५२ हेक्टर असून संपादित क्षेत्र ६२८ हेक्टर आहे. बेरडी या गावाचे पूर्नवसन न झाल्यामुळे हा प्रकल्प होण्यास विलंब होत असून प्रकल्पाची किंमत वाढत चालली आहे. प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील भेंडाळा, विरूर स्टेशन, खांबाळा, सिंधी, नलफडी, मुर्ती, विहिरगाव, कोलामगुडा येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.
भेंडाळा प्रकल्पाचे काम ४० वर्षापासून सुरू असून चुकीच्या कालव्याच्या नियोजनामुळे शासनाचे करोडो रुपये वाया जात आहे. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी व वरदान ठरणाऱ्या या सिंचन प्रकल्पाला पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमता वाढविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)