१४ अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण

By Admin | Updated: July 22, 2014 23:55 IST2014-07-22T23:55:39+5:302014-07-22T23:55:39+5:30

बालकांना चांगल्या वातावरणात ज्ञानार्जन करता यावे, या हेतूने मूल तालुक्यात पोषण आहार जिल्हा योजनेंतर्गत सन २०१०-११ या वर्षात आंगणवाडी बांधकामासाठी निधी मंजूर केला. मात्र प्रशासनाच्या

14 Anganwadi construction is incomplete | १४ अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण

१४ अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण

मूल : बालकांना चांगल्या वातावरणात ज्ञानार्जन करता यावे, या हेतूने मूल तालुक्यात पोषण आहार जिल्हा योजनेंतर्गत सन २०१०-११ या वर्षात आंगणवाडी बांधकामासाठी निधी मंजूर केला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अंगणवाडींचे बांधकाम अपूर्ण आहे. सन २०१०-११ या वर्षात मंजूर २१ अंगणवाडी बांधकामापैकी सात आंगणवाडी बांधकामाचे काम सन २०१३-१४ या वर्षात पूर्ण करण्यात आले. मात्र उर्वरित १४ अंगणवाडीचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने बालकांच्या ज्ञानार्जनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या १४ अपूर्ण असलेल्या आंगणवाडी बांधकामात भादुर्णी, डोंगरगाव, चितेगाव, टेकाडी, सादाग हेटी, ताडाळा, चिंचाळा, विरई, गडीसुर्ला, बेंबाळ, जुनासुर्ला, पिपरी दिक्षित, फिस्कुटी, नांदगाव या गावांचा समावेश आहे. पोषण आहार जिल्हा नियोजन अंतर्गत सन २०१०-११ या वर्षात अंगणवाडी बांधकामाचे ७० लाख रुपयांचे अंदाजपत्र करण्यात आले. त्यात शासनाने १२ लाख रुपयांपर्यंत निधी पंंचायत समिती मूलला वितरित केला.
मात्र संवर्ग विकास अधिकारी व संबंधित कनिष्ठ अभियंंता यांच्या दुर्लक्षितपणामुळे बांधकाम करण्यास पाहिजे त्या प्रमाणात रस दाखविला नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लाखो रुपयांचा निधी धूळ खात पडला आहे.
मंजूर २१ अंगणवाडीपैकी १४ आंगणवाडी बांधकाम अपूर्ण दिसत आहे.
मंजूर झालेल्या वर्षात अंगणवाडी बांधकाम करण्यात आले असते तर लहान बालकांना त्याचा लाभ घेता आला असता, आजच्या स्थितीत जुन्या अंगणवाडी मोळकडीस आल्याने बालकांचे शिक्षण अपूर्ण राहत असल्याचे दिसून येते.
जवळपास प्रत्येक आगणवाडी बांधकामास ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध असतानाही बांधकाम होऊ नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 14 Anganwadi construction is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.