शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत ठेवली तब्बल १३ हजार प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावीत. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसासुद्धा वाचतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदाची पहिलीच राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. गत वर्षी तीन राष्ट्रीय लोकअदालतीमधून जिल्ह्यात सात हजार प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली होती, तर शनिवारच्या लोक अदालतीमध्ये १३ हजारांहून अधिक प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विधिसेवा प्राधिकरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आपली प्रलंबित प्रकरणे निकाली काढून आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले. जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर न्या. केदार, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव, आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावीत. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसासुद्धा वाचतो. असे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे जानबा पाटील आणि विजय शेंडे या पक्षकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विधिसेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी न्यायाधीश एस. एम. मौदेकर, के. पी. श्रीखंडे, एन. एन. बोदरकर, एम. एस. काळे, स्नेहा जाधव, ए. एन. माने, एन. एम. पंचारिया, आर. व्ही. मेटे यांच्यासह लॉ कॉलेजचे विद्यार्थी, उपस्थित होते.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत