शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

१३ मॉडेलची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:50 PM

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्थानिक भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडले.

ठळक मुद्देजिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप : १९५ प्रतिकृतींचा सहभाग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्थानिक भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडले. या प्रदर्शनात सहभागी १९५ प्रतिकृतीपैकी १३ प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.तीन दिवसीय प्रदर्शनाचा बुधवारी समारोप झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा, आरोग्य समिती सभापती कृष्णा सहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. नागो गाणार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, शिक्षण समिती सदस्य नितू चौधरी, प्राचार्य धनंजय चाफले, डॉ प्रशांत ठाकरे, प्रकाश रहांगडाले, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, संस्थेचे सचिव केशवराव जेणेकर, शाळेचे मुख्याध्यापक महेशकर उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक तयार व्हावे, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक मॉडेल्स तयार करावे, वैज्ञानिक तयार होऊन जिल्ह्याचे नाव उज्वल करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी अहवाल वाचन केले. संचालन प्रिती बलकी यांनी तर आभार राहागडाले यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावर मॉडेल नेणारे अशोक भगत यांचा सत्कार करण्यात आला. प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉ. प्रशांत ठाकरे, प्रमोद निखाडे, गणेश जामनकर, अमोल काकडे, सतीश खोब्रागडे आणि संदिप कासवटे यांनी काम पाहिले. प्रदर्शनाला विविध शाळांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली.निवड झालेल्या प्रतिकृतीउच्च प्राथमिक गट ( बिगर आदिवासी)ख्रिस्तानंद स्कूल अ‍ॅड ज्युनिअर कॉलेज, ब्रम्हपुरीचा तनिष्क दुलारी गाढवे प्रथम, बाल विकास प्राथमिक शाळा, मूलची मृणाली गोपाल बलेवार द्वितीय, तर जि.प. प्राथमिक शाळा, कापसीचा वैभव संतोष कोसरे हा याची प्रतिकृती तृतीय ठरली. आदिवासी गटात जि.प. प्राथमिक शाळा, चेकलिखितवाडा येथील वैष्णवी नरेश बांगरे हिच्या प्रतिकृतीची निवड झाली.माध्यमिक/उच्च माध्यमिक गट (बिगर आदिवासी गट)ख्रिस्तानंद स्कूल अ‍ॅड ज्युनिअर कॉलेज, ब्रम्हपुरीचा विक्रांत भाउराव कुथे प्रथम, सेंट क्लारेंट इंग्लिश मीडियम स्कूल चिमूरची सानिक संजय साखरकर द्वितीय, तर मायक्रोन न्यु सायन्स कॉलेज चंद्रपूरचा ऋषिकेश बळीराम पवार याची प्रतिकृती तृतीय ठरली. आदिवासी गटात विवेकानंद विद्यालय बेंबाळचा गणेश रमेश सुरतीकर याच्या प्रतिकृतीची निवड झाली.प्राथमिक शिक्षक गट (शैक्षणिक साहित्य)जि.प. उच्च प्रस्थामिक शाळा टेंभुरवाहीचे बाबा देवराव कोडापे, माध्यमिक-उच्च माध्यमिक गटात आॅर्डन्स फॅक्टरी हायर सेंकडरी स्कूल भद्रावतीचे सुरेश कुमार भगत, लोकसंख्या शिक्षण गटात जनता विद्यालय, गोंडपिंपरीचे वेणूधर महादेव सोनटक्के, माध्यमिक-उच्च मध्यमिक गटात जनता विद्यालय, ताडाळीच्या विना एस. भगत, प्रयोगशाळा परिचर-सहायक गटात लोक विद्यालय चालबर्डीचे गणेश प्रभाकर बदखल यांच्या प्रतिकृतीची निवड करण्यात आली.