सास्ती येथे १३ लाखांची दारू जप्त

By Admin | Updated: August 30, 2015 00:36 IST2015-08-30T00:36:12+5:302015-08-30T00:36:12+5:30

अमरावती येथून राजुरा तालुक्यातील सास्ती येथे दारू घेऊन दाखल झालेला ट्रक गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.

13 lakhs of liquor seized at Sasai | सास्ती येथे १३ लाखांची दारू जप्त

सास्ती येथे १३ लाखांची दारू जप्त

ट्रकसह दोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर : अमरावती येथून राजुरा तालुक्यातील सास्ती येथे दारू घेऊन दाखल झालेला ट्रक गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. या ट्रकमधून १३ लाख रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधाकर अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, जमादार संजय नेरकर, विजय गिनगुले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद जमादार डांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत १५० देशी दारूच्या व ३३ विदेशी दारूच्या पेट्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ही दारू एका ट्रक (एमएच.१९-झेड-०६२८) ने सास्ती येथे आणली जात होती. हा ट्रक सास्तीजवळील पुलाजवळ उभा करण्यात आला होता. याची खबर मिळताच, पोलिसांनी सापळा रचून सदर ट्रक ताब्यात घेतला. ट्रकची झडती घेतली असता, त्यात दारूसाठा आढळून आला. (प्रतिनिधी)

Web Title: 13 lakhs of liquor seized at Sasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.